गुगल स्थापना दिन*
*@ ४ सप्टेंबर @*
*गुगल स्थापना दिन*
इंटरनेटवरील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा आपला मित्र म्हणजे गुगल. वास्तविक गुगलची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ ला झाली आहे. गुगल कंपनीच्या स्थापने पासून २००४ पर्यंत गुगल आपला ४ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हा पासून गुगलचा वाढदिवस २७ सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. मेन्लो पार्क मधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती. खरंतर Google चं नाव ठेवायचं होतं Googol. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे Google असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं. त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले.
१९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे गुगल असे नाव ठेवण्यात आले. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. एवढेच नव्हे. गुगल आपल्या डुडल साठीही प्रसिद्ध आहे. २००२ साली गुगलने पहिल्यांदा डुडल तयार केलं. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गुगल आपल्या होमपेजवर डुडलद्वारे प्रसिद्ध करते.

Comments
Post a Comment