@ १ ऑगस्ट @* *जागतिक स्तनपान सप्ताह*

 *@ १ ऑगस्ट @*

*जागतिक स्तनपान सप्ताह*


जागतिक स्तनपान सप्ताह १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट असा साजरा केला जातो. सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपानाचे आई व मुलाच्या आरोग्याला होणारे फायदे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे तिचे स्त्रीत्व पूर्ण करणारे तिचे मातृत्व. मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेले दूध हे तिच्या शिशु साठी अमृतासमान असते. आईच्या स्तनातून स्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषणघटक आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी त्याचा होणारा फायदा याची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही. ककून फर्टिलिटी IVF कन्सल्टंट डॉ. राजलक्ष्मी वालावलकर यांच्या मते, स्तनपानाने मिळणारे दूध हे  नक्कीच एक उत्तम पोषणमूल्ये असणारे आहे जे नवजात शिशुला अन्य कोणत्याच बाहेरील दुधातून मिळू शकणार नाही. स्तनपान हे आईच्या आरोग्यासाठी हि लाभदायक आहे. 


*स्तनपानाचे मातांना होणारे फायदे*

*१)* कर्करोगाचे प्रमाण कमी होते - आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माता हि आपल्या नवजात शिशुला पुरेसे स्तनपान करू शकते का हा केवळ प्रश्नच आहे. परंतु ज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते. काही स्तनपान करणाऱ्या मातांना दुग्धपान करताना संप्रेरकातील बदलामुळे त्यांच्या मासिक पाळी उशिराने येणं यांसारख्या गोष्टी अनुभवाव्या लागतात. याचा एकंदरीत परिणाम म्हणजे स्त्रियांच्या शरीरातील एस्ट्रॉगन सारख्या संप्रेरकाची कमतरता निर्माण होते. अंतिमतः स्तनामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास सुरुवात होते. गर्भधारणेच्या तसेच स्तनपानाच्या काळात स्तनातील पेशीमध्ये बदल होत असतात. या पेशींमधील बदलामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी होते. 

*२)* बाटलीने दूध भरवणाऱ्या मातांच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास तसेच गर्भधारणे आधीची शरीरयष्टी पुन्हा मिळवणे अधिक सोपे होते. गर्भवती मातांचें शरीर हे गर्भधारणेच्या काळात अधिकाधिक चरबी साठवून ठेवत असते कारण शरीरामध्ये दूध निर्माण होण्याच्या कालावधी मध्ये जास्त कॅलरीज साठवून ठेवण्याची गरज असते. अशा वेळी स्तनपान करणाऱ्या मातांना त्यांच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अधिक मदत होते याउलट बाटलीने दूध भरवणाऱ्या मातांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. 

*३)* आई आणि बाळाचे नाते दृढ होते - स्तनपानावेळी आई आणि बाळा मधील अंतर हे सर्वात कमी असते. मूल हे आईच्या इतके जवळ असते कि, ते सहज आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ओळखू शकते. प्रक्रियेतून बाळामध्ये शांती आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागते. स्तनपान करताना संप्रेरका मध्ये होणारे बदल हे सुद्धा आई आणि बाळ यांच्या नात्यात दृढता आणणारे ठरतात. ऑक्सिटोसिन हे एक प्रेम वाढवणारे संप्रेरक असून यामुळे स्तनपान करणाऱ्या माता आणि त्यांचे मूल यांच्या मध्ये एक उच्चपातळीचे भावनिक संबंध निर्माण करण्यास मदत करतात. 


*स्तनपानामुळे बाळांना होणारे फायदे*

*१)* उत्तम पोषणाचा स्रोत - स्तनपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोत्तम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्व, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाप असते. त्यात बरीच प्रतिबंधात्मक द्रव्ये असतात. ज्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गा पासून, ऍलर्जी यांसारख्याना रोगांना प्रतिकार करणे शक्य होते. तसेच या दुधामुळे अस्थमा व दमा होण्याची शक्यता फार कमी होते. 

*२)* स्तनपानामुळे मुलांच्या मेंदूचा विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमता हि उंचावते. स्तनपानाचा अर्भकाच्या विकासातील हा सर्वोत्तम दुवा आहे.



Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 11th English Chapter 1 The Portrait of a Lady