३१ जुलै ❀* *लेखक मुन्शी प्रेमचंद जन्मदिन*

 *❀ ३१ जुलै ❀*

*लेखक मुन्शी प्रेमचंद जन्मदिन*




जन्म - ३१ जुलै १८८० (वाराणसी)

स्मृती - ८ ऑक्टोबर १९३६


मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. प्रेमचंदांनी १९१३ ते १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क' मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली. प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थान वरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त केली गेली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले. 


१९२१ पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. १९२३ मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस' ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले. प्रेमचंद यांचे साहित्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील प्रेमचंद यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. एक संवेदनशील लेखक, सुजाण नागरिक आणि एक कुशल वक्ता अशी ओळख असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३०० लघुकथा, कादंबऱ्या आणि अनमोल अशा साहित्याचा खजिना दिला आहे. संप्रदाय, भ्रष्टाचार, जमिनदारी, गरिबी अशा विषयांवर भाष्य करत मुन्शी प्रेमचंद यांनी आपले साहित्य रचले होते. अतिशय सोप्या सरळ भाषेत लिखाण करणाऱ्या प्रेमचंद यांचे साहित्य नवोदित लेखकांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहे. 



Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 11th English Chapter 1 The Portrait of a Lady