@ २४ जुलै @* *भारतीय विज्ञान संस्था स्थापना दिन*

 *@ २४ जुलै @*

*भारतीय विज्ञान संस्था स्थापना दिन*




स्थापना - २४ जुलै १९११


भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ- अभियांत्रिकी मध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे. भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.



Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 11th English Chapter 1 The Portrait of a Lady