१२ जुलै @* *जागतिक कागदी पिशवी दिवस*
*@ १२ जुलै @*
*जागतिक कागदी पिशवी दिवस*
१२ जुलै हा दिवस 'जागतिक कागदी पिशवी दिवस' (वर्ल्ड पेपर बॅग डे) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्या मागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्या वापरण्या विषयी जनजागृती करणे. १२ जुलै १८५२ मध्ये फ्रान्सिस ओले यांनी पहिली कागदी पिशवी बनवली होती आणि त्यात सुधारणा करत १८७० मध्ये मार्गारेट किंग यांनी किराणा नेता येईल अशी कागदी पिशवी बनवली होती. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे. सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे ती थोडीशी त्रासदायक आहे पण दीर्घकालीन परिणाम पाहता समाजाच्या हिताचीच आहे. कागदी पिशव्या हानिकारक प्लास्टिक पिशव्यासाठी पर्यावरणास अनुकूल पर्याय आहेत. आजच्या दिवशी आपण अशी प्रतिज्ञा करु की, मी फक्त पेपर बॅगच वापरीन.

Comments
Post a Comment