@ १७ जुलै @* *जागतिक न्याय दिवस*
*@ १७ जुलै @*
*जागतिक न्याय दिवस*
आज जागतिक न्याय दिवस (World Day for International Justice). आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय द हेग, नेदरलॅंड येथे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतातील न्यायाधीश म्हणून दलबीर भंडारी हे सध्या कार्यरत आहेत. तसेच नागेंद्र सिंग, रघुनंदन स्वरूप फाटक, बी.एन. राऊ, पी. चंद्रशेखर राव यांनी देखील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतातील न्यायाधीश म्हणून भूमिका बजावलेली आहे. १७ जुलै ही रोम या देशाला संविधान लागू होण्याची तारीख आहे. तसेच १ जून २०१० ला कंपाला (युगांडा) मध्ये रोमच्या संविधानाबद्दल चर्चा करण्यासाठी संमेलन आयोजित करण्यात आले. तेथील विधान सभेत अनेक पक्षांद्वारे १७ जुलै ही आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या रूपात साजरा करण्या संबंधी निर्णय घेण्यात आला. या दिवसाची आवश्यकता कशासाठी आहे की, जागतिक स्तरावर न्यायाचे समर्थनार्थ लोकांना जागरूक व एकजूट करण्याची गरज आहे. तसेच या दिवसाचा मुख्य उद्देश पीडितांच्या अधिकारांना वृद्धिंगत करणे आहे. हा दिवस जगभरातील लोकांना गंभीर मुद्यांवर लक्ष वेधण्यासाठी आवश्यक आहे. हा दिवस समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींना शांतता व सुव्यवस्था प्रभावित केल्यास त्यांच्या होणाऱ्या गंभीर परिणामाची चेतावनी देतो.
Comments
Post a Comment