❀ १० जुलै ❀* *संशोधक निकोला टेस्ला जन्मदिन*
*❀ १० जुलै ❀*
*संशोधक निकोला टेस्ला जन्मदिन*
जन्म - १० जुलै १८५६
स्मृती - ७ जानेवारी १९४३ (न्यूयॉर्क,अमेरिका)
संशोधक निकोला टेस्ला हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता. त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे. मोबाइलची SMS सेवा ही आजच्या काळातील गरज मानली जात असली तरी त्याबाबतची कल्पना शंभर वर्षांपूर्वीच मांडली गेली होती. संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ आणि विद्युत अभियंता निकोला टेसला यांनी १९०९ साली 'पॉप्युलर मेकॅनिक्स' नावाच्या तंत्रज्ञानविषयक मासिकात लिहिलेल्या लेखात 'एसएमएस' सारखी सेवा भविष्यात अस्तित्वात येईल, असे भाकीत वर्तविले होते. आजच्या जगात जीवनावश्यक बाब बनलेली मोबाइल सारखी जलद आणि निर्दोष असणारी संदेशवहन सेवा अस्तित्वात येईल, असे शंभर वर्षांपूर्वी कोणालाही वाटले नसेल; पण अमेरिकेतील निकोला यांनी भविष्याचा वेध घेत छोट्या बिनतारी यंत्राची कल्पना केली होती.
विद्युत अभियंता टेसला यांच्या नावाने आजही टेसला इलेक्ट्रिक मोटार कंपनी आहे. इलेक्ट्रिकमध्ये बिनतारी ऊर्जा असते हे पहिल्यांदा टेसला यांनी ओळखले होते. त्यांनी लेखात नमूद केले होते की, जगात सर्वत्र वापरली जाणारी आणि हाताळण्यास सोपी असणारी संदेशवहन करणारी छोटी बिनतारी यंत्रणा अस्तित्वात येऊ शकते आणि एक दिवस या तंत्रातून प्रत्येकाला आपल्या नातेवाइकांशी, मित्रांशी सहज संवाद साधणे शक्य होऊ शकेल. या यंत्राच्या माध्यमातून नव्या युगाची सुरवात होईल. निकोला टेसला यांच्या शोध निबंधात एसी विद्युत, एसी मोटार, पॉलिफेज विद्युत पारेषणचा समावेश आहे.

Comments
Post a Comment