@ १७ जुलै @* *जागतिक इमोजी दिन*
*@ १७ जुलै @*
*जागतिक इमोजी दिन*
'इमोजी' म्हणजे शब्दांना भावनेत व्यक्त करणारा एक प्रतीक. व्हॉट्सॲप, फेसबुक, मेसेंजर यांच्यामुळे आताच्या काळात संदेश पाठवताना अविभाज्य भाग बनल्या आहेत, इतक्या की चक्क त्यांच्यासाठी स्वतंत्र 'डे' सुद्धा साजरा केला जातोय. इमोजीपीडियाच्या जेरेमी बर्ज यांनी प्रथम १७ जुलै हा दिवस 'इमोजी डे' म्हणून २०१४ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. इमोजीची सुरुवात १९९८ च्या आसपास जपानी फोन्समध्ये करण्यात आली होती. १९९५ च्या आसपास पेजर्स वापरले जायचे त्यावेळी जपानच्या NTT डोकोमोने एक इमोजी वापरली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. काही काळ स्मायली सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. फेसबुकवर ही इमोजी गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी दुपटीने वापरली गेली आहे. एकूण २८०० हुन अधिक इमोजी पैकी जवळपास सर्वच म्हणजे २३०० रोजच्या रोज वापरल्या जात आहेत. भारतात फेसबुकवर केकची 🎂 ही इमोजी सर्वाधिक वापरली जाते. ट्विटरवर भारतीय डोळ्यात पाणी येई पर्यंत हसण्याची इमोजी 😂 सर्वाधिक वापरण्यात येते. आणि त्यानंतर या 😍, 🙏 इमोजीचा वापर होतो. आणि लाईक करण्यासाठी या इमोजीचा 👍 , 👌 मात्र भरपूर वापर होतो. इमोजी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments
Post a Comment