*@ २९ जुलै @* *नासा स्थापना दिन*
*@ २९ जुलै @*
*नासा स्थापना दिन*
स्थापना - २९ जुलै १९५८
नासा (नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. १९५८ साली या संस्थेची स्थापना झाली. कोणे एके काळी, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जागतिक स्तरावर फक्त दोनच महासत्ता अस्तित्वात होत्या. त्या दोन महासत्ता म्हणजे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका. त्या दोघांनाही दुसऱ्यापेक्षा जास्त बलशाली व आधुनिक देश बनवण्याची इच्छा होती. साहजिकच त्यांच्यात अतिशय आक्रमक अशी स्पर्धा सुरू झाली ज्याचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रात सुरू झाला, खासकरून संरक्षण व अवकाश संशोधनाच्या विभागात. ऑक्टोबर १९५७ मध्ये सोव्हियत संघाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी स्पुटनिक उपग्रह अंतराळात लाँच केला तेव्हा तो आपल्या या अभियानाबरोबरच अंतराळ स्पर्धेत अमेरिकेपेक्षा बराच पुढे निघून गेला. अर्थात शीतयुद्ध अजूनही सुरूच होते आणि कोणत्याही प्रकारे सोव्हियत संघाचं हे पुढे जाणं कमी करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू होते.
अमेरिकेने आधीच एक उपग्रह तयार केला होता. अर्थात त्याची निर्मिती नासाच्या कार्यक्रमांतर्गत झालेली नव्हती. पण, अंतराळ स्पर्धेत सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी अमेरिका सुनियोजित अंतराळ संस्था बनवण्याच्या मार्गावर आहे, हे त्यावेळी स्पष्ट दिसत होतं. सोव्हियत संघाच्या अंतराळ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसनआवर आणि सिनेटर लिण्डन बी जॉन्सन यांनी नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) स्थापनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला वेग दिला. अर्थात असं असूनही नासाला अस्तित्वात येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागला आणि २९ जुलै १९५८ मध्ये ती अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत नासाने अनेक यशस्वी अंतराळ योजना राबवल्या आहेत. नासा ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. १९५८ साली या संस्थेची स्थापना झाली. नासाने आपलं पहिलं अंतराळ यान एक्सप्लोअरर-१ हे १९५८ मध्ये लाँच केलं. या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंत अनेक यशस्वी योजना राबवल्या असून चंद्रावर पहिलं मानवी पाऊल ठेवण्याचं श्रेय त्याच देशाला जातं.
विराट विश्वाची ‘आभाळमाया’ नेमकी कशी आहे त्याचा ‘प्रत्यक्ष’ धांडोळा घेणारा एक शक्तिशाली ‘डोळा’ १९९० मध्ये ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश विज्ञान संस्थेने अवकाशात पाठवला आणि त्याने देदीप्यमान कामगिरी करून विश्वातील ग्रह, तारे, दीर्घिका, तेजोमेघ या सर्वांची लाखो तेजस्वी छायाचित्रं पृथ्वीकडे पाठवली. आता मंगळावर जीवन आहे की नाही यासाठी या संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासा ही जगात अग्रस्थानी आहे.

Comments
Post a Comment