@ १८ जुलै @* *जागतिक नेल्सन मंडेला दिवस*
*@ १८ जुलै @*
*जागतिक नेल्सन मंडेला दिवस*
_"कोणतीही व्यक्ती जन्मल्या नंतर जात-धर्म, वर्ण, कुटुंबाचा द्वेष करत नाही. द्वेषभावना तो नंतर शिकतो. याच पद्धतीने आपण प्रेम करायला का शिकू नये." - नेल्सन मंडेला_
जागतिक नेल्सन मंडेला दिवस १८ जुलै रोजी साजरा केला जातो, जो त्यांचा वाढदिवस देखील असतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व वर्णद्वेषा विरुद्ध आवाज उठवणारे लोकप्रिय नेते ‘मादिबा’ म्हणजेच नेल्सन मंडेला यांचे ९६ व्या वर्षांत पदार्पण होत आहे. संयुक्त राष्ट्र त्यांचा वाढदिवस नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा करते. संपूर्ण जगभर शांतता, स्वातंत्र्य व समानतेचा संदेश पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून म्हणाले, मंडेला यांनी ६७ वर्षा पर्यंत देश, मानवी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. जगभरातील लोकांनी ६७ मिनिटे चांगल्या कामासाठी द्यावीत, असे आवाहन त्यांच्या फाउंडेशन बरोबर आम्ही करत आहोत. मंडेला दिन साजरा करण्याचा उद्देश- नेल्सन मंडेला यांना १९६४ मध्ये रोबन बेटावरील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगात त्यांचा क्रमांक ४६६६४ होता. ४६६६४ यामध्ये ४६६ कैदी क्रमांक तर ६४ हा त्या वर्षांचा अंक. ४६६६४ या क्रमांकाला आता नवी ओळख मिळाली आहे. मंडेला यांनी नेल्सन मंडेला फाउंडेशन मार्फत याच संख्ये एवढे सामाजिक कार्य हाती घेण्याचा संदेश दिला. यामध्ये एचआयव्ही/ एड्स जनजागरण तसेच तरुणांशी संबंधित कार्यक्रमाचा समावेश आहे. मंडेला यांच्या वाढदिवसा निमित्त जगभर ४६६६४ कार्यक्रमांचे आयोजन होते. या वेळेत जगभरातील लोक समाजकार्य व गरिबांना मदत करतात. मंडेला यांनी देशासाठी केलेल्या ६७ वर्षे आंदोलनाचे प्रतीक म्हणून ते साजरे केले जाते.
नेल्सन मंडेला यांचा जन्म १८ जुलै १९१८ रोजी कुनू गावातील थेंबु शाही कुटुंबात जन्म. त्यांचे लहानपणचे नाव ‘रोहिल्लाहल्ला’ मंडेला होते. शाळेतील शिक्षकाने नंतर नेल्सन नाव ठेवले. १९६४ मध्ये सरकारने त्यांची अटक करून जन्मठेप भोगण्यासाठी रोबेन बेटावरील तुरुंगात रवानगी केली. १९९० मध्ये त्यांची सुटका झाली. १९९३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे ते पहिले कृष्णवर्णीय नेते ठरले.
Comments
Post a Comment