❀ १२ जुलै ❀* *शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर जन्मदिन*

 *❀ १२ जुलै ❀*

*शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर जन्मदिन*


जन्म - १२ जुलै १८६४ (अमेरिका)

स्मृति - ५ जानेवारी १९४३ (अमेरिका)


जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्या नंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्राविण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्या पासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्या साठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायका मध्ये समावेश होतो. मराठीत वीणा गवाणकर यांनी कार्व्हर यांच्या आयुष्यावर आधारित 'एका होता कार्व्हर' हे राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित पुस्तक लिहिले आहे.



Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary