❀ २० जुलै ❀* *गिर्यारोहक एडमंड हिलरी जन्मदिन*

 *❀ २० जुलै ❀*

*गिर्यारोहक एडमंड हिलरी जन्मदिन*


जन्म - २० जुलै १९१९ (न्यूझीलंड)

स्मृती - ११ जानेवारी २००८ (न्यूझीलंड)


सर एडमंड हिलरी हे शेर्पा तेनसिंग नोर्गे बरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्ट साठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमे अंतर्गत केली. एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमा व्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला. त्यांनी हिमालयातील साहसमोहिमा बरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्याणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी ह्यांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नाते देखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' या पदावर काम केले आहे.



Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary