@ ११ जुलै @* *शिवराय प्रतापगडावर पोचले*
*@ ११ जुलै @*
*शिवराय प्रतापगडावर पोचले*
खानाने सर्वदूर धुमाकूळ मांडला असतानाच महाराज श्रावण शुद्ध द्वितीयेला म्हणजे सोमवार दिनांक ११ जुलै १६५९ रोजी राजगडाहून जावळीस प्रतापगडावर पोचले. महाराज जावळीस पोचले ते अफझलखानाला किंवा मृत्यूच्या भीतीने नाही तर राजगड ते प्रतापगड यादरम्यान असणाऱ्या शेतकरी कष्टकरी मावळ्यांचा मुलुख अफझलखानाच्या तावडीतून वाचवा म्हणून राजे मृत्यूच्या दोन पावले जवळच आले. मुळात जावळीचा प्रदेश खडतर त्यावेळी प्रतापगडाला यायला एकच वाट अस्तित्वात होती ती म्हणजे रणतोंडीची वाट, ज्या वाटेहून येताना तोंड रडल्या शिवाय राहणारचं नाही अशी ती वाट. शत्रूला अतिशय भयानक वाटणारा पण मावळ्यांचा जोडीदार सह्याद्री इथे थोडा जास्तच राकट होता, न इथेच महाराजांच्या युद्धनीतीने खानाचा निःपात करता येणार होता. ज्याला दुनियेने 'गनिमी कावा' म्हणून संबोधले परंतू आपण त्यास शिवसूत्र मानले. कमीत कमी फौजेनिशी दुष्मनाच्या जास्तीत जास्त फौजेचा अत्यंत कमीतकमी वेळेत संपूर्ण पराभव झाला. 'जिथे मराठ्यांचा कावा तिथे इतरांनी वाका' कारण दुसरा पर्यायच नाही.
Comments
Post a Comment