@ २९ जुलै @* *जागतिक व्याघ्र दिन*

 *@ २९ जुलै @*

*जागतिक व्याघ्र दिन*




जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून घोषित करण्यात आला. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे एक लाख वाघ होते. सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत. सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात.


Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 11th English Chapter 1 The Portrait of a Lady