❀ २० जुलै ❀* *राजा अलेक्झांडर द ग्रेट जन्मदिन
*❀ २० जुलै ❀*
*राजा अलेक्झांडर द ग्रेट जन्मदिन**
जन्म - २० जुलै ३५६ (मॅसेडोनिया,ग्रीस)
स्मृती - ११ जून ३२३ (बाबिलॉन,इराक)
अलेक्झांडर द ग्रेट (सिकंदर) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाब पर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे. प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहास कारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यापैकी अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्यावर प्लूटार्कचा इतिहास अधिक समग्र आहे. इ.स.पूर्व ३५६ मध्ये मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची चौथी पत्नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला.
प्लूटार्कच्या इतिहासानुसार वयाच्या केवळ दहाव्या वर्षी अलेक्झांडरने ब्युसाफलस या नाठाळ घोड्याला काबूत आणल्याची गोष्ट वाचण्यास मिळते. हा घोडा विकावयास आणला तेव्हा अत्यंत उत्तम गणला गेला होता परंतु तो कोणाच्याही काबूत येत नसल्याने फिलिपने तो विकत घेण्याचे नाकारले. अलेक्झांडरने ह्या घोड्याला काबूत आणण्याची फिलिपकडे परवानगी मागितली आणि त्याला आपल्या काबूत करून त्यावर स्वार होऊन दाखवले.या अतुलनीय शौर्यावर खूश होऊन फिलिपने हा घोडा अलेक्झांडरला भेट दिला. या घोड्यावरून पुढे अनेक स्वाऱ्यांत अलेक्झांडरने लढाई केल्याचे सांगितले जाते. इ.स.पू. ३२३ मध्ये ११ जूनच्या दुपारी अलेक्झांडर द ग्रेट बाबिलॉनच्या दुसऱ्या नेबुकड्रेझर या राजाच्या राजवाड्यात मरण पावला. त्याचे वय फक्त ३३ होते. राजा अलेक्झांडर वर आधारित हिंदीतला सोहराब मोदी दिग्दर्शित 'सिकंदर' हा चित्रपट १९४१ साली निघाला. त्यात सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर यांच्या भूमिका होत्या.
Comments
Post a Comment