✹ ४ जुलै ✹* *शास्त्रज्ञ मेरी क्युरी स्मृतिदिन*

 *✹ ४ जुलै ✹*

*शास्त्रज्ञ मेरी क्युरी स्मृतिदिन*


जन्म - ७ नोव्हेंबर १८६७ (वॉर्सा,पोलंड)

स्मृति - ४ जुलै १९३४ (फ्रांस)




मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी या शास्त्रज्ञ होत्या. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोनदा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो. मेरी क्युरी यांचा जन्म पोलंडची राजधानी वॉर्सा येथे झाला. त्यांचे मूळचे नाव स्क्लोदोव्स्का असे होते. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १८९५ साली तिचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला. हिने पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले.


किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंड सारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंड मधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जा्स्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते. नोबेल पारितोषिक पटकावणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पण पहिला मान त्यांनी मिळवला.


* भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक (१९०३)

* डेवी पदक (१९०३)

* मात्तॉय्ची पदक (१९०४)

* इलियत क्रेसन पदक (१९०९)

* रसायनशास्त्रात नोबेल (१९१0)

********************************

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary