✹ १८ जुलै ✹* *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन*
*✹ १८ जुलै ✹*
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन*
जन्म - १ ऑगस्ट १९२० (वाटेगाव,सांगली)
स्मृती - १८ जुलै १९६९ (मुंबई)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीन-दुबळ्यांचे, उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे साहित्यिक नि लेखक. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच शाळेत गेले नाहीत. परंतु तरीही आपल्या लेखणीच्या जोरावर समाज मन ढवळून काढण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी गायलेले पोवाडे, लेखण, रचना, समाजकार्य आणि राजकारण आजही लोकांच्या हृदयात आहे. त्यांच्या 'फकिरा' (१९५९) या कादंबरीला प्रचंड यश मिळाले. या कादंबरीस राज्य सरकारने १९६१ सालात उत्कृष्ट कादंबरी पुरुस्कार देऊन गौरविले. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार पाहुयात.
*१)* हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
*२)* जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव.
*३)* नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
*४)* जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
*५)* अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.
*विशेष बाबी* :
* तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
*.ते दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले.
* १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹४ टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते.
* पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
* अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.
* अण्णाभाऊ यांच्या जातीव्यवस्था, दलित सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामिण जीवन यांतील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात.
* महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत.
* पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे.
* त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.
*साहित्य संपदा* :
* लोकनाट्य : १३
* नाटके : ३
* कथासंग्रह : १३
* कादंबर्या : ३५
* पोवाडे : १५
* प्रवास वर्णन : १
* चित्रपट कथा : ७
Comments
Post a Comment