@ १६ जुलै @* *अपोलो-११ चांद्रयान चे प्रक्षेपण*

 *@ १६ जुलै @*

*अपोलो-११ चांद्रयान चे प्रक्षेपण*


[ १६ जुलै १९६९ ते २४ जुलै १९६९ ]


अपोलो मोहीम ही चंद्रावरील पहिली मोहीम होती. (१९६१ - १९७५) यातील अपोलो ११ मोहिमे मध्ये २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर सर्वात प्रथम पाऊल ठेवले. अपोलो ११ यानातून चंद्रावर नील आर्मस्ट्राँग व एडविन आल्ड्रिन यांनी ४१ वर्षांपूर्वी, २० जुलैला चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले. २० जुलै १९६९ रोजी हे यान चंद्रावर पोचले. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले त्यासाठी एका लहान उपयानातून तो प्रवास केला होता. या यानाला लुनार मोड्युओल असे म्हणत असत. पृथ्वीवरून चंद्रा पर्यंत नेणारे मुख्य यान चंद्रा भोवती फिरत राहिले होते. या यानाला कमांड मोड्यूल असे म्हणत. चंद्रावर उतरणार्‍या यानाला अलगदपणे खाली उतरणे आणि पुन्हा उड्डाण करून मुख्य यानापर्यंत जाऊन मिळणे यासाठी लागणारे इंधन व दळवळणाची व्यवस्था त्यात केलेली होती. चंद्रावर पोहोचताच ‘ह्य़ूस्टन, ट्रँक्विलिटी बेस हिअर, इगल हॅज लॅन्डेड’ हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला गेला.



Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary