@ २५ जुलै @* *देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती*
*@ २५ जुलै @*
*देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती*
प्रतिभा देवीसिंह पाटील या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर २५ जुलै २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६ व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व १९६२ ते १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या. राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुंटूंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतींना निवृत्ती नंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते त्यात पाटील यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली, यावर टिका झाल्या नंतर मात्र त्या ६००० वर्ग फुटावर बंगला बांधला आहे.
Comments
Post a Comment