@ २१ जून @* *राष्ट्रीय सेल्फी डे*
*@ २१ जून @*
*राष्ट्रीय सेल्फी डे*
आज राष्ट्रीय सेल्फी डे (National Selfie Day). स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’ शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण ते ठिकाण आपल्या सकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात ‘सेल्फी’ काढण्याची हौस जास्त दिसून येते. पूर्वी स्वत:चा फोटो काढण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज असे, ती गरज आज मोबाईल सेल्फी तंत्रज्ञानाने मिटवली आहे. आता माणसं वेगवेगळ्या प्रकारात सेल्फी काढतात. कधी कुटुंब व मित्रमंडळी समवेत तर कधी स्वत:च्या पाळीव प्राण्या समवेत. सेल्फीचा इतिहास दीडशे वर्षाहून जुना असला तरी स्मार्टफोन मुळे सेल्फीचा ट्रेण्ड जगभरात वाऱ्याच्या वेगाने पसरू लागला. २०११ च्या उत्तरार्धा पासून सुरू झालेल्या स्मार्टफोनने सेल्फीच्या ट्रेण्ड मुळे चांगलाच जम बसवला आहे. सेल्फी हा शब्द २०१३ मध्ये ऑक्सफोर्ड चर्चेचा भाग झाला. तसेच त्या वर्षी २०१३ या वर्षातला शब्द म्हणून (word of the year) नाव देण्यात आले.

Comments
Post a Comment