*✹ १८ जून ✹*

*धावपटू मिल्खा सिंग स्मृतिदिन*


जन्म - २० नोव्हेंबर १९२९ (गोविंदपुरा)

स्मृती - १८ जून २०२१ (चंदीगड)


महान धावपटू 'फ्लाइंग सीख' मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. त्यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिक मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धे मध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं. रोम ऑलिम्पिक मध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅन पेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.


मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धां मध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धां मध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं. लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. 


मिल्खा सिंगच्या आई वडिलांचा मृत्यू फाळणी दरम्यानच्या दंगली मध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर सोबत झाले. त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 'भाग मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी कोरोनाने निधन झाले. पाच दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचंही कोरोना मुळे निधन झाले होते.


********************************

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 11th English Chapter 1 The Portrait of a Lady