*जागतिक मल्लखांब दिन*

 *@ १५ जून @*

*जागतिक मल्लखांब दिन*




मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरा मध्ये पोचला आहे. मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेल्या मल्लखांबाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची स्थापना १५ जून १९८१ रोजी झाली. त्याच प्रमाणे, बडोदा येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा तिसरा खंड १९३२ मध्ये प्रकाशित झाला. व्यायाम ज्ञानकोश खंड क्र ३ (मल्लखांब) यात दिलेल्या माहिती नुसार, मल्लखांबाचे आद्यगुरू बाळंभट दादा देवधर यांना श्री हनुमानाने ही विद्या शिकवण्यासाठी दिलेल्या दृष्टांताची तारीख सुद्धा पंचांगाशी जुळवल्या नंतर १५ जूनच्या आसपासचीच येते. त्यामुळे १५ जून या तारखेचे औचित्य साधून, संघटनेने २०१७ पासून १५ जून हा दिवस 'मल्लखांब दिन' म्हणून साजरा करायचे ठरवले. मल्लखांबाचा प्रचार, प्रसार यासाठी कार्यक्रम आयोजित करणे, जुन्या खेळाडूंना या खेळामध्ये परत बोलावणे, जेणेकरून मल्लखांबाचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शक परत एकत्र येऊन मल्लखांबाची प्रगती अजूनही जोरात होईल, असे प्रयत्न आहेत.


******************************

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 11th English Chapter 1 The Portrait of a Lady