*✹ १८ जून ✹*
*सेनापती संताजी घोरपडे स्मृतिदिन*
जन्म - १६६० (भाळवणी,सांगली)
स्मृती - १८ जून १६९७ (कर्खेळ)
सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे झाला होता. औंधच्या यमाई संताई देवीच्या नावावरून संताजी हे नाव ठेवले होते. ते मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते. धनाजी जाधव यांच्या सोबत घोरपडे यांनी जवळ जवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पुर्णता: नष्ट होत असताना, सरसेनापतीपदाची वस्त्रे मामलकत मदार हे भुषण स्वरुपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे यांना देवुन स्वराज्याची पुनश्च बांधणी करण्याचा विडा दिला.
एक वेळ अशी होती राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते. त्यावेळी सरसेनापती संताजीनी हिंदवी स्वराज्याची पुर्नबांधनी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला. मुघलांच्या साम्राज्याची पुर्णता: धुळदाण केली. औरंगजेब व त्याचे मोठे सैन्य ह्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडले. त्यांनी मुघलांची आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली. अशीहानी करणारे सरसेनापती संताजी हे मराठ्याच्या इतिहासातील एकमेव पराक्रमी वीर होते. संताजींच्या बलीदानानंतर, हिंदवीस्वराज्याचा कारभार करणे छत्रपतीना सोपे झाले व त्यांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला.
संताजी घोरपडे यांची स्वराज्य सेवा १६७४ ते १६९७ मधील थोडक्यात माहीती...
* १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पागेच्या जूमलेदार हुद्यावर रूजू झाले.
* १६७७ साली कोप्पळ प्रांतात कासिमखान व हुसेनखान या मियाणा बंधूंशी झालेल्या लढाईत संताजीनी पराक्रम गाजवला.
* १६७९ साली छत्रपती शिवाजी महाराज बरोबर जालनाच्या स्वारीत संताजीनी पराक्रम गाजवला.
* ऑक्टोबर १६८१ साली कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पठाण व बेरडांचा पराभव केला, अनैक ठाणी सर केली. छत्रपती संभाजीमहाराज कडून सन्मान मिळाला.
* ऑगस्ट १६८९ साली श्रावणी बैल पोळ्याच्या दिवशी औरंगजेबाच्या तूळापूर छावनीत हल्ला करून सोन्याचे कळस कापले. परत येताना रायगडास वेडा घालून बसलेल्या इतिकाद खानावर हल्ला केला.
* ऑक्टोबर १६८९ साली बेन्नूरच्या राणीवर चालून जाणाऱ्या जान निसारखान, मतलबखान, शर्जाखान यांचा संताजीकडून पराभव झाला.
* एप्रिल १६९० साली साताऱ्याच्या पायथ्याशी शर्जाखान याचा पराभव व त्याला कैद केली.
* जून १६९० साली म्हसवड जवळ पिलीवच्या घाटात लुत्फुल्लाखानावर हल्ला केला.
* ६ जुलै १६९० साली लुत्फुल्लाखानाच्या छावणीवर रात्रीचा छापा घालून दाणादाण उडवली.
* ऑगस्ट१६९० साली संताजीनी कसबे नांदगज, परगणे, कडेवली येथील गढ्यांवर हल्ला केला.
* १६९१ साली संताजीना सरसेनापती पदाची प्राप्ती झाली.
* जून १६९१ साली जाननिसारखान व तहव्वुरखान यांचा संताजी कडून पराभव झाला.
* ऑक्टोबर १६९२ संताजीनी बेळगांव, धारवाड प्रदेशात जबरदस्त धुमाकूळ घातला.
* १४ डिंसेबर १६९१ साली कांचीचा फौजदार अलिमर्दखान याचा संताजी कडून पराभव व कैद.
* ५ जानेवारी १६९३ साली जुल्फकारखानावर देसूर येथे संताजीनी हल्ला केला.
* ७ फेब्रुवारी १६९३ साली संताजीचा कासीमखानावर हल्ला करून पराभव केला.
* एप्रिल १६९३ साली संताजीचा त्रिचन्नापल्लीस वेढा व नायकाची शरणागती.
* ऑक्टोबर १६९३ साली संताजीची नजीबखान बहाद्दर याच्या बरोबर लढाई झाली.
* नोव्हेंबर १६९३ साली विक्रमहळ्ळी जवळ हिमतखान, हमिउद्दीनग ख्वाजाखान यांच्या बरोबर लढाई.
* नोव्हेंबर १६९३ साली संताजीची उत्तर कर्नाटकात मोहिमेवर चैथाईची वसुली.
* नोव्हेंबर १६९३ साली संताजींकडून आलूर गढी समोर हिंमतखानाचा पराभव.
* फेब्रुवारी १६९४ साली संताजीची गोवळकोंडा प्रदेशात मोहीम.
* मार्च १६९४ साली संताजीनी मलकूर गावाजवळ चैत्रसाल राठोडवर हल्ला.
* नोव्हेंबर १६९४ साली संताजीच्या विजापूर सुभ्यात हिंमतखानाशी लढाया झाल्या.
* डिंसेबर १६९४ साली संताजीची नळदुर्ग जवळ हिंमतखानाशी लढाई.
* नोव्हेंबर १६९५ साली संताजीचा कासिमखान याच्या बरोबर दोड्डेरीच्या लढाईत महान विजय.
* २० जानेवारी १६९६ साली बसवापट्टाणच्या लढाईत हिंमतखान संताजी कडून ठार.
* २५ फेब्रुवारी १६९६ साली संताजीची हमिदुद्दीनखान सोबत लढाई.
* एप्रिल १६९६ साली संताजीची जुल्फकारखानाशी लढाई.
* ऑगस्ट १६९६ साली जूल्फिकारखान बरोबर लढाई.
* मे १६९७ साली शंभू महादेवाच्या डोंगरात आश्रयाला आले.
* १८ जून १६९७ साली ईस्लामपूर (राजापूर) मधील महादेव मंदिराजवळ ओढ्यात आंघोळ करून ध्यानस्थ बसले असतांना याच ठिकाणी संताजीचा गलिच्छ राजकारणाला बळी पडून खून झाला. त्यानंतर कलेवर द्वारका बाईसाहेब घोरपडे सरकार यांनी धडास कुरुंदवाड घाटावर आनून आग्नी देण्यात आला
*संताजी घोरपडे व घोरपडे घराण्यावर लिहलेली पुस्तकें आणि लेखकाचे नाव*
* कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याची पत्रे (शं.ह वर्टीकर)
* कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याचा इतिहास खंड १ व २ (स.मा. गर्गे, शं.ह. वर्टीकर)
* हिंदुराव घोरपडे घराण्याचा दक्षिणेकडील इतिहास (स.मा. गर्गे)
* मुधोळकर घोरपडे घराण्याचा ईतिहास (बाबुराव घोरपडे )
* मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास (द.वि. आपटें)
* सेनापती संताजी घोरपडे (डॉ. जयसिंगराव पवार)
* मराठा सत्तेचा उदय (डॉ. जयसिंगराव पवार)
* शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ. जयसिंगराव पवार)
* मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध (डॉ. जयसिंगराव पवार)
* अद्वितीय सेनानी सेनापती संताजी घोरपडे (बाळासाहेब माने)
* संताजी कादंबरी (काका विधाते)
* झुंजार सेनापती संताजी घोरपडे (प्रभाकर बागुल)
* नरवीर सेनापती संताजीराव घोरपडे (शशिकांत पाटील)
* रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे (महेश तेंडुलकर)
* रणधुरंधर संताजी घोरपडे (शीला रिसबुड)
* पराक्रमाची शर्थ जाहली (नयनतारा देसाई)
* सेनापती (सचिन कानिटकर)
* घोडदौड संताजींची (प्रभाकर भावे)
* अजिंक्य (दशरथ पाटील)
* इचलकरंजीकर घोरपडे घराण्याचा इतिहास (ह.ग. खरे)
*संदर्भ : विकिपीडिया*
Comments
Post a Comment