आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी करावा
आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी करावा
रोजच्या आयुष्यात एक प्रयत्न आपण नक्कीच करून पाहिला पाहिजे. तो म्हणजे, आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण स्वतः आनंदी राहावे आणि आपण ज्यांच्यासोबत असू त्यांचाही तो क्षण जास्तीतजास्त आनंद करायला हवा.
अर्थात, हे असे प्रयत्न करायला फार कष्ट पडत नाहीत. त्यासाठी पैसे लागत नाहीत आणि फार विचारही करावा लागत नाही. फार हुशारी नसली तरीही हे जमू शकते आणि लोकलेखी स्मार्टनेस नसेल तरीही लोकांना खूश ठेवता येऊ शकते. आपल्या सहवासात राहून लोकांना आनंद मिळाला पाहिजे, ही मुळात आपली इच्छा असायला हवी. म्हणजे, तसे प्रयत्न आपोआपच आपल्या हातून होऊ लागतात. त्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात, तर काही गोष्टी टाळायच्या असतात. शिवाय, त्यासाठी असलेले वेळेचे बंधनही लक्षात घ्यावे लागते. कारण, दोघांच्याही
आयुष्यातील ते क्षण क्षणाक्षणाने संपून जात असतात.
आयुष्य हे त्याच्या क्रमाने पुढे सरकत असते. पण, त्या क्षणांच्या आठवणी मात्र आयुष्यभर पुरतात. म्हणूनच, स्वतः आनंदी राहावे आणि सोबतच्या लोकांनाही आनंदी ठेवावे.
आपल्यावर कोणतीही परिस्थिती ओढवली तरीही, त्याही परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवणे ही खरेतर एक स्वतंत्र अशी कला आहे. ती सहजपणे जमत नसली, तरी तितकीशी अवघडही नक्कीच नाही. पण, ही कला ज्याला जमली, त्याचे आयुष्य सोपे होते. कारण, आनंद हा कधीच एखाद्या वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये नसतो.
परिस्थिती बदलली की, वस्तू आणि व्यक्ती बदलू शकतात. म्हणूनच, आपल्या सुखाची किल्ली, दुसऱ्यांच्या हाती देऊ नये. वस्तू आणि व्यक्ती यांच्या पलिकडे असलेला आनंद शोधला पाहिजे.

Nice post
ReplyDelete